Saturday, November 4, 2023

मराठी संस्कृतीची आजची अवस्था

मराठी आणि एकंदरीतच खाद्य संस्कृती..

♦️तांदूळ भाकरी १५ रुपयांची महाग वाटते, आणि त्याच तांदळाचा डोसा ५० ते १५० रुपये असून सुध्दा महाग ही भाकरी वाटते.


♦️बटाटा वडा १७ रुपये झाला की महागाईत वाढ झाली असे वाटते पण त्याच बटाट्याचा मॅकडोनाल्ड चा बर्गर ९९ रुपये असला तरी महागाई वाढलेली वाटत नाही. 


♦️पारंपरिक व अत्यंत मेहेनातीची पुरणपोळी २५-३० रुपये झाली तर ग्राहकाची लूट चालू आहे असं वाटतं आणि त्याच चण्याच्या पिठाचा ५० रुपये १०० ग्रॅम ढोकळा हा योग्य दराचा वाटतो.


♦️भाजणी चकली, शंकरपाळे, विविध लाडू, थोडक्यात दिवाळीचे फराळे एक हजार रुपयात आखी दिवाळी आनंदात आणि नाती जोडण्यात घालवू शकतो पण दीड हजारात चौघांना पुरणार पिझ्झा, कॅडबरी, केक हा आज सणांची शान आहे असं लोकांना वाटतं. 


थालीपीठ, आंबोळी, सोलकडी, उकडीचे मोदक, अळूवडी असे अनेक पदार्थ आहेत जे आज बाजारात मराठी ग्राहकच पाठ फिरवत आहेत म्हणून दुर्मिळ होत चाललेत

No comments:

Post a Comment

Ghats in Maharashtra - Mountain Passes

  A   ghat  is nothing but a mountain pass. The term “Ghat” describes the mountain pass in Maharashtra. They pave the way for passage from o...