Skip to main content

Posts

Showing posts with the label आर‍‍ती

'घालीन लोटांगण' या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहित आहे का ?

कोणत्याही देवाच्या आरती नंतर एका सुरात व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते. अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे. सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात. आज आपण या प्रार्थने मधील वैशिष्टे पाहूया व त्याचा अर्थ  समजावून घेऊ. ही प्रार्थना चार कडव्याची आहे व पाचवे कडवे हा एक मंत्र आहे. वैशिष्ट्ये : (१) प्रार्थनेतील चारही कडव्यांचे रचयिता वेगवेगळे आहेत. (२) ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत. (३) पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत. (४) बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे. पण ही सर्व देवांच्या आरती नंतर म्हणली जाते. (५) वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे. आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया १) घालीन लोटांगण वंदीन चरणl डोळ्यांनी पाहिन रूप तुझे |  प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन |  भावे ओवाळीन म्हणे नामा | वरील कडवे संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे अर्थ... विठ्ठलाला उद्देशुन संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करी