Skip to main content

Posts

Showing posts from December, 2023

जंगल साद

 नुकताच एक लेख वाचनात आला. जंगलातल्या खर्या राहणी बद्दल-  ✨ या दोघी           आणि जंगल...     ❄️ या दोघी .एकीच वय ६० दुसरीचं ८०. दाजिपूरच्या जंगलाला लागून ठकूचा धनगरवाडा आहे. तेथे फक्त त्यांचे पिढ्यान पिढ्याचे एकच घर आहे. तिन्ही बाजुला दाट जंगल. यांच्या घरात आजही लाईट नाही. रस्ता नाही. ठकूचा धनगरवाडा म्हणजे कै.ठकू धनगराचे घर. त्याची चौथी पाचवी पिढी आजही तेथे रहाते या पिढीतील ठकू धनगराची नातसुन लक्ष्मी वय ६०. व ठकुची मुलगी सोना वय ८0 व एक खापर पणतू याक्षणी येथे रहातो. आजुबाजुला वस्ती नाही. गवे बिबट्या अस्वलाचा यांच्या घराजवळ सतत वावर. त्यामुळे दिवस मावळला की घराचे दरवाजे बंद . सोबतीला फक्त दोन गावठी कुत्री. घरात रॉकेल किंवा डिझेलची चिमणी . ती विझवली की रात्रभर सभोवती फक्त काळोख आणि जंगलातून वाट काढत घुसणाऱ्या वाऱ्याचा घुमणारा आवाज. रात्री कुत्री भेदरून, आकसून कुई कुई करू लागली की या दोघींनी ओळखायच . बाहेर काय तरी आलय. आणि उठायच्या भानगडीत न पडता पुन्हा मुरगटुन झोपायच. पावसाळ्यात तर तीन महिने घराबाहेर पडायच नाही. लाकुड पेटवुन धुनी कर...

तावडे हॉटेल कोल्हापूर

इंटरनेट वरुन साभार.. तावडे हॉटेल पुरात हॉटेल बुडाले हे हॉटेल शंकर कदम ऊर्फ तावडे यांच्यानंतर त्यांची मुले केरबा, पांडुरंग, बाबासाहेब, निवृत्ती आणि मुलगी हौसाबाई यांनी चालविले. 1989 मध्ये पंचगंगेला महापूर आला आणि त्यात निम्मे हॉटेल बुडाले. त्यानंतर शिरोली नाका ते गांधीनगर फाटा रस्ता चौपदरी झाला आणि त्या रस्त्याखालीच तावडे हॉटेलच्या खोपटाचा शेवट झाला. वीस वर्षे झाली, तावडे हॉटेलचे तेथे कसलेही अस्तित्व नाही, पण तावडे हॉटेलच्या आठवणी जाग्या आहेत. त्यामुळेच तावडे हॉटेल नसले तरी त्याची ओळख मात्र राहिली आहे.  कोल्हापूर - कोल्हापुरात येण्यासाठी मुंबईपासून कन्याकुमारी पर्यंतच्या महामार्गावर कोणत्याही ट्रकमध्ये बसायचं, ट्रक ड्रायव्हर कन्नड, तमिळी, मल्याळी बोलणारा असू दे, त्याचा एक शब्दही तुम्हाला नाही कळू दे, कोल्हापुरात उतरायचं असेल तर कोल्हापूर नव्हे, फक्त #तावडे_हॉटेल असे म्हणायचे. तो ट्रक बरोबर कोल्हापूरच्या फाट्यावर येऊन थांबणार, म्हणजेच आपण "तावडे हॉटेल‘ केवळ हा एका शब्दाचा पत्ता सांगून कोल्हापुरात येऊन पोचणार.  तावडे हॉटेल आणि कोल्हापूरचं नातं असं एक नव्हे, दोन नव्हे, 75 ते 77 वर...